Wednesday, 1 November 2023, Bhatye
या आठवड्यात उत्तर गोलार्धातील आकाश निरीक्षकांना एक रुपविकारी ताऱ्यातील बदल पाहण्याची चांगली संधी आहे. अल्गोल पर्सियसच्या तारकासमुहात स्थित आहे आणि तो अशा काही मोजक्या ताऱ्यांपैकी एक आहे ज्यांच्यातील बदल उघड्या डोळ्यांनी पाहता येईल.
अल्गोल (Beta Persei) हा शोधलेला पहिला रुपविकारी तारा आहे. (अशा ताऱ्यांच्या तेजस्वीपणात बदल होतो). याच्या तेजस्वीपणाची तुलना करणारे तारे म्हणजे गॅमा एंड्रोमेडे ते अल्गोलच्या वर, तीव्रता 2.1 आणि एप्सिलॉन पर्सेई त्याच्या खाली, 2.9 तीव्रता. पर्सियस तारकासमुह दिसत असताना तुम्ही रात्री घराबाहेर पडता तेव्हा तुम्ही ही गोष्ट तपासू शकता. अल्गोल दर 2.87 दिवसांनी मंद होतो आणि पुन्हा हळुहळू तेजस्वी होतो. त्याचे हे बदल उघड्या डोळ्यांनी पाहता येणारे आहेत. या बदलाच्या मध्याला अल्गोल नेहमीच्या 2.1 च्या तेजस्वीतेच्या प्रती ऐवजी 3.4 तीव्रतेने अंधुकपणे चमकतो. अल्गोलच्या या ग्रहणाच्या दरम्यान तो जवळजवळ दोन तासांपर्यंत मंद दिसतो.
सध्या तुम्ही पर्सिअस तारकासमुह ईशान्ये दिशेला (उत्तर-पूर्व) 8pm वाजता पाहू शकता.
अल्गोलची तेजस्वीपणात बदल होतो कारण त्याच्या सभोवतालच्या कक्षेत एक लहान, मंद तारा आहे. दर 2.87 दिवसांनी, तो लहान तारा त्याच्या मोठ्या, तेजस्वी साथीदारासमोरून जातो आणि त्याचा काही प्रकाश रोखतो.